अनिल बुक एजन्सी हे नागपूर येथील प्रसिद्ध प्रतिष्ठान आहे. श्री. अनिल दा. टांकसाळे यांनी मराठी भाषेवरील प्रेम, आदर आणि आवडीमुळे वयाच्या अवघ्या 20 व्यां वर्षी हे पुस्तकांचे दालन जन सामान्यांसाठी खुले केले.


1977 सालापासून सुरू झालेली ही ज्ञानगंगा आजही अव्ययाहत वाहते आहे. 46 वर्षांपासून या प्रतिष्ठानाने अनेक पुस्तके वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व प्रकाशक अनिल बुक एजन्सी येथे आपली पुस्तके विक्रीस पाठवितात.


आजही येथे पुरातन ते अद्ययावत सर्व प्रकारची हिंदी व मराठी पुस्तके वाचकांना उपलब्ध आहेत.
शेवटी वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार पुस्तक हेच मानवाचा खरा मित्र आहे. आपणा सर्वांचे या पुस्तक दालनात स्वागत आहे.

श्री. अनिल दा. टांकसाळे
Proprietor